साहित्य:
उडीद डाळ -१ कप
मूग डाळ – १/२ कप
पोहे – २ चमचे
मेथ्या-१/२ चमचा
खाण्याचा सोडा -१/२ चमचा
आले – लसूण पेस्ट -१
चमचा
हिरवी मिरची पेस्ट -१ चमचा
कोथिंबीर बारीक चिरलेली -३ चमचे
जिरे पावडर -१ चमचा
हळदी पावडर -१/२ चमचा
मीठ स्वादानुसार
तेल आवश्यकते प्रमाणे
कृती :
१.
उडीद डाळ, मूग डाळ आणि
मेथ्या रात्रभर पाण्यात भिजून ठेवावे.
२.
पाणी काढून टाकावे. मिक्सरमधून
डाळीचे मिश्रण बारीक व घट्ट वाटून घ्यावे.
३.
आता पोहे, खाण्याचा सोडा,
आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, जिरे पावडर, हळदी पावडर, कोथिंबीर आणि मीठ
वरील मिश्रणात मिक्स करावे.
४.
२-३ मिनिटासाठी वरील मिश्रण
मिक्सरमधून वाटून घ्यावे. वरील सर्व साहित्य मिश्रणात एकजीव होईल.
५.
कढईत तेल गरम करा आणि पकोडे
सोनेरी रंगाचे तळून घ्या.
६.
गरमागरम पकोडे हिरव्या चटणी
सोबत किंवा टोमाटो सॉंस सोबत वाडा.
No comments:
Post a Comment